लोकपाल विधेयकाचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल, तर ते अण्णा हजारे आणि सर्वसामान्य जनतेलाच दिले पाहिजे, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी या विधेयकावरून कोणत्याही राजकीय पक्षाने श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट केले.
राज्यसभेच्या सिलेक्ट समितीने सुचविलेल्या सुधारणांच अंतर्भाव असलेले सुधारित लोकपाल विधेयक राज्यसभेने मंजूर केल्यानंतर ते पुन्हा मंजुरीसाठी लोकसभेपुढे मांडण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी सुधारित विधेयक लोकसभेत मांडले. त्यावर बोलताना स्वराज म्हणाल्या. हे विधेयक मंगळवारी राज्यसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर आता त्यावरून श्रेय घेण्याचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र, या विधेयकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. या विधेयकाचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल, तर ते यासाठी सातत्याने उपोषण करणाऱया अण्णा हजारे यांना द्यायला हवे. त्यानंतर याचे श्रेय देशातील सर्वसामान्य जनतेला देता येईल. अन्य कोणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.

Story img Loader