पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या एका संशयीत एजंटला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. स्वॅट पथक आणि गु्न्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
Suspected ISI agent Zahid arrested by Police in Bulandshahr pic.twitter.com/Yxvb3R5NU0
— ANI UP (@ANINewsUP) October 27, 2018
युपी पोलिसांच्या माहितीनुसार, जाहिद असे या ‘आयएसआय’ एजंटचे नाव असून तो बुलंदशहर येथील खुर्जा नगरचा रहिवासी आहे. मेरठ इथल्या लष्करी भागाची काही छायाचित्रे घेऊन ती पाकिस्तानला पाठवून जाहिद बुलंदशहराकडे परतत होता. २०१२ आणि २०१४ तो पाकिस्तानला जाऊनही आला आहे. त्याचे नातेवाईकही पाकिस्तानात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे विशेष पथक या आयएसआय एजंटची चौकशी करीत आहे.