New Orleans Terrorist Attack Update : नववर्षादिनीच अमेरिकेत भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात आतापर्यंत १५ जण ठार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हा दहशतवादी हल्ला होता, असं फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने म्हटलंय. या हल्ल्यातील संशयिताच्या ट्रकवर आयएसआयएसचा ध्वज होता. त्याने इतरांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले असावे असा दावा एफबीआयने केला आहे. अमेरिकेच्या फ्रेंच क्वार्टरमध्ये हा हल्ला झाला.

संशयित हल्लेखोर शमसुद-दिन जब्बार याने प्रथम जमावावर हल्ला केला आणि नंतर जमावावर गोळीबार केला. यात १५ ठार आणि किमान ३० जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी तपास करताना पोलिसांना बंदुका आणि इतर उपकरणांसहित एक सुधारिक स्फोटक यंत्रही सापडलं. तसंच, वाहनावर ISIS चा झेंडा सापडला आहे.

Naxalites killed former Panchayat Samiti chairman Sukhdev Madavi accusing him of helping police
नक्षल्यांकडून माजी पंचायत समिती सभापतीची हत्या, पोलीस खबरी असल्याचा…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Former Chief Election Commissioner Naveen Chawla passes away
माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे निधन
Pranav Kumar Champion
भाजपाच्या माजी आमदाराकडून काँग्रेस आमदाराच्या घरावर गोळीबार; VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक!
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?
Vishnu Gupta Attack
अजमेर दर्ग्याखाली शिव मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्तांच्या कारवर गोळीबार, थोडक्यात बचावले
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Afghan National Arrested For Illegally Staying In India For 17 Years
भारतात १७ वर्षांपासून बेकायदा राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला मायदेशी पाठविण्याचे आदेश

हल्ल्याआधी हल्लेखोराकडून व्हिडिओ

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की एफबीआयला असे व्हिडिओ सापडले जे हल्लेखोराने हल्ल्याच्या काही तास आधी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यात त्याने म्हटले होते की तो इस्लामिक स्टेट गटाकडून प्रेरित आहे. संशयिताने व्हिडिओ रेकॉर्डमध्ये ISIS मध्ये सामील होण्याच्या स्वप्नांचा उल्लेख केला.

हेही वाचा >> New Orleans Attack : अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोरांनी सुरू केला गोळीबार; १२ लोकांचा मृत्यू

कुटुंबाला मारण्याचा डाव

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, जब्बारने त्याच्या व्हिडिओमध्ये त्याच्या कुटुंबाविषयी सांगितलं आहे. तो त्याच्या घटस्फोटाविषयी बोलला असून त्याच्या कुटुंबाला सेलिब्रेशनच्या नावाखाली मारण्याचा डावही त्याने आखला होता. परंतु, नंतर आयएसआयएसमध्ये सामिल होण्याकरता त्याने त्याचा हा डाव रद्द केला.

जब्बारने हे एकट्याने केलं असेल, असं आम्हाला वाटत नाही. आम्ही प्रत्येक पैलुचा अभ्यास करतोय. त्याच्या अनेक सहकाऱ्यांचाही शोध आम्ही घेतोय, असं एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे संशयितांच्या शोधात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सार्वजनिक माहितीनुसार, जब्बार हुस्टॉनमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होता. त्याने त्याच्या एका व्हिडिओमध्ये बुमाँटमध्ये त्याचा जन्म झाल्याचं त्याने म्हटलंय. तसंच, अमेरिकेच्या लष्करात त्याने मानवी संसाधन आणि आयटीतज्ज्ञ म्हणून त्याने १० वर्षे काम केल्याचाही उल्लेख त्याने व्हिडिओत केला आहे.

जब्बार हा मार्च २००७ ते जानेवारी २०१५ पर्यंत नियमित सैनिक होता आणि त्यानंतर जानेवारी २०१५ ते जुलै २०२० पर्यंत आर्मी रिझर्व्हमध्ये होता. त्याला फेब्रुवारी २००९ ते जानेवारी २०१० पर्यंत अफगाणिस्तानात तैनात केले होते आणि स्टाफ सार्जंट पदावरून तो शेवटी निवृत्त झाला.

घटनेविषयी प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पांढऱ्या रंगाचा ट्रकने बॅरिकेड्स तोडून फुटपाथवरील लोकांना चिरडले. या घटनेवेळी तिथे उपस्थित असलेला २२ वर्षांचा केविन गार्सिया म्हणाला की, “बोर्बन फुटपाथच्या डाव्या बाजूला एक ट्रक अनेकांना चिरडत असल्याचे मी पाहिले. यावेळी एक मृतदेह माझ्यादिशेने उडाला. यानंतर लगेचच मला गोळाबाराचाही आवाज ऐकू आला”, याबाबत सीएनएनने वृत्त दिले आहे.

Story img Loader