नक्षलवादी असल्याच्या संशयावरून एका १७ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी बुधवारी येथे अटक केली. या तरुणाकडून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे.
छत्तीसगढमधील राजनंदनगाव जिल्ह्य़ाचा रहिवासी आहे. छत्तीसगढ सीमेला लागून असलेल्या सुलसुली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत तो कोरची दालम या नक्षलवादी गटासोबत काम करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. पोलीस या युवकाची अधिक चौकशी करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा