Crime News : तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन एका दलित माणसाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. छत्तीसगड येथील रायगड जिल्ह्यात ही घटना रविवारी घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते हे मॉब लिंचिंग असल्याचं म्हणत आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. तसंच भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील दुमारपल्ली गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या एका व्यक्तीला तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली. सारथी अलियास बुटू असं मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला अजय प्रधान आणि अशोक प्रधान या दोघांसह एकाने तांदूळ गोणी चोरल्याच्या संशयावरुन झाडाला बांधलं आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

Photo Of MLA Sanjay Kelkar.
BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजपा आमदाराची खदखद
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Image of Allu Arjun And Hyderabad police.
Allu Arujn : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या! चौकशीसाठी पुन्हा समन्स, पोलीस उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
decisions in GST Council’s 55th meeting
अग्रलेख: अब तक ५६!
Ladki Bahin Yojana
Maharashtra News LIVE Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय

पोलीस सूत्रांनी काय सांगितलं?

ही घटना घडल्यानंतर गावातल्या सरपंचांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहिलं की सारथी झाडाला बांधलेल्या अवस्थेत तसेच आहेत आणि बेशुद्ध झाले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सारथी यांना बांबूने तसंच लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर पोलिसांनी कलम १०३ (१) अंतर्गत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader