एपी, मॉस्को
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रशियाच्या सुरक्षा दलांनी रविवारी दक्षिण रशियामधील एका तुरुंगात कारवाई करून दोन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवणाऱ्या इस्लामी दहशतवादी गटाशी संबंधाचा आरोप असलेल्या कैद्यांना ठार केले. येथील सरकारी वृत्तवाहिनी ‘आरटी’ने ही माहिती दिली. घटनास्थळावरील पत्रकारांनी गोळीबाराचा आवाज आल्याचे सांगितले, तर समाजमाध्यमातही अनेक रुग्णवाहिका तुरुंगात दाखल होताना दिसल्याचे वृत्तवाहिनीने सांगितले. या हल्ल्यात ओलीस ठेवलेले जखमी झाले नाहीत, असे रशियाच्या ‘फेडरल पेनिटेंशरी सर्व्हिस’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
रोस्तोव-ऑन-डॉनमधील प्री-ट्रायल तुरुंगात हे ओलीसनाट्य रंगले. यात काही संशयित दहशतवादी कैदी ठार झाल्याचे ‘आरटी’सह अन्य वृत्तवाहिन्यांनी सांगितले. ओलीस ठेवणारे ६ जण रोस्तोव्ह भागात पेनचाकू, रबर बॅटन आणि कुऱ्हाड आदी शस्त्रे बाळगून होते. या कैद्यांमध्ये दहशतवादी गटाशी संबंधांचा आरोप असलेल्यांचाही समावेश होता, असे अलीकडेच सरकारी वृत्तसंस्था ‘टास’ने अज्ञात स्राोतांचा हवाला देऊन सांगितले होते. समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या छायाचित्रांमध्ये दोन ओलीस ठेवणाऱ्यांनी हेडबँड घातले होते, त्यात ‘आयसिस’च्या ध्वजाशी साम्य असलेले चित्र होते, तर इतर छायाचित्रांमध्ये हे कैदी चाकू चालवताना दिसले.