हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या १२ खासदारांनी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या नातीच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थिती लावली. वैंकय्या नायडूंच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. वैंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापतीदेखील आहेत. उपस्थिती लावणाऱ्यांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सरन्यायाधीश रमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांचा समावेश होता.

निलंबित खासदारांनी रिसेप्शनला उपस्थिती लावल्याने मात्र आश्चर्य व्यक्त होत होतं. कारण वैंकय्या नायडू यांनीच त्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. निलंबित खासदार यावेळी फोटोंसाठीही एकत्र येताना दिसले.

निलंबित खासदारांबाबतच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार

शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, सीपीएमचे एलामारन करीम, सीपीआयचे विश्वम आणि डोला सेन, तृणमूल काँग्रेसच्या शांता छेत्री यांचं राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्याही सहा खासदारांचा समावेश आहे. खासदारांचं निलंबन करण्यात आल्यापासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून संसदेबाहेर गांधी पुतळ्याजवळ निदर्शनं केली जात आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षांचे १२ खासदार निलंबित ; शिवसेनेचे अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश

विरोधकांकडून वारंवर निलंबन मागे घेण्याची मागणी केली जात आहे. यामुळे संसदेत गेल्या काही आठवड्यांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्धही सुरु आहे. रविवारी केंद्र सरकारने विरोधकांना निलंबनासहित इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र विरोधकांनी चर्चेसाठी नकार दिला.

निलंबित खासदार –

प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई (शिवसेना), एलामारन करीम (माकप), फुलोदेवी नेताम, छाया वर्मा, रिपूण बोरा, राजमणी पटेल, नासीर हुसन, अखिलेश सिंह (काँग्रेस), बिनय विश्वम (भाकप), डोला सेन आणि शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस), प्रतापसिंह बाजवा, संजय सिंह यांना वगळले!