बंगळुरूमधील हुलिमावू परिसरात एका एसयूव्ही कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. एसयूव्हीच्या मागे असलेल्या एका वाहनावर बसवलेल्या डॅश कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एसयूव्ही कार रस्त्यात आडव्या येणाऱ्या प्रत्येक दुचाकीला धडक देऊन पुढे जाताना दिसत आहे. एका दुचाकीवरील व्यक्ती तर अनेक फूट हवेत फेकल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे. तर अन्य एक दुचाकीस्वार कारच्या धडकेत पदपथावर कोसळताना दिसत आहे.

विचित्र अपघाताच्या या घटनेत एकूण चारजण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर एसयूव्हीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.