Suvendu Adhikari Contai Cooperative Bank polls : पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत १८ जागांवरून १२ वर घसरलेल्या भारतीय जनता पार्टीला लागोपाठ धक्के बसत आहेत. यानंतर आता तृणमूल काँग्रेस पक्षाने सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील कोंटाई येथील स्थानिक सहकारी बँकेच्या निवडणुकीतही भाजपाचा धुव्वा उडवला आहे. यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत येथील अत्यंत महत्त्वाची जागा जिंकल्यानंतर आता भाजपाला मोठा हदरा बसला आहे. कोंटाई येथील जागेवर सुवेंदू यांचे बंधू दिबेंदू यांनी आणि तामलुक येथून कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी विजय मिळावला आहे. डाव्या विचारसरणीची सरकारे असताना तीन दशकांहून अधिक काळ दिवेंदू अधिकारी यांच्या कुटुंबाने कोंटाई कोऑपरेटिव्ह बँकेवर पकड कायम ठेवली होती.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
centre appointed alok aradhe as chief justice of bombay high court
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे; देवेंद्र कुमार यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली
Maharashtra CM Devendra Fadnavis Attends Shaurya Diwas Program In Panipat
…तर देशाचा इतिहास वेगळा असता! पानिपतमध्ये मराठा शौर्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे योद्ध्यांना अभिवादन
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार

मात्र १५ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाने १०१ जागांवर विजयाचा दावा केला, ज्यामध्ये १५ जागा या संचालक पदाच्या होत्या. तर भाजपाला अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोंटाई आणि तामलुकमधील १४ पैकी १३ विधानसभा मतदारसंघात भाजपाने आघाडी घेऊन देखील भाजपाला या पराभवाला सामोरे जावे लागले.

जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात विधानसभा पोटनिवडणूकीत झालेल्या पराभवानंतर आता त्यांच्या बालेकिल्ल्यात झालेला हा पराभव विरोधी पक्षनेता सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी अडचणी वाढवणारा ठरू शकतो.

लोकसभा निवडणुकीत राज्यभरात भाजपाला मिळालेल्या यशामुळे सुवेंदू अधिकारी यांनी काहीसा दिलासा मिळाला होता, पण सहकारी बँक मात्र त्यांच्या हातातून निसटली आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या अनेक सहकारी बँकांच्या कामकाजाची चौकशी करण्याच्या निर्णयानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये पदावरून हटवले जाईपर्यंत सुवेंदू हे सहकारी बँकेचे चेअरमन होते. सुवेंदू यांना कोलकता उच्च न्यायालयाकडून १६ जुलै २०२१ मध्ये दिलासा मिळाला. या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला की बँकेच्या खात्यांची तपासणी केली जाऊ शकते परंतु त्याच्या परवानगीशिवाय कोणतेही विशेष ऑडिट केले जाऊ शकत नाही.

सहकारी बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे सुवेंदू यांनी पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागू शकतो. लोकांच्या मनात बदलत गेल्यास टीएमसी कोंटाईमध्ये आपले वर्चस्व निर्माण करू शकते.

केंद्रीय मंत्री असून देखील प्रदेशाध्यक्ष असलेले सुकांता मुजीमदार यांच्यामुळे सुवेंदू अधिकारी यांना केंद्राचा पाठिंबा असलेले नेते मानले जाते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवार निवडीमध्ये त्यांचा सहभाग होता, त्यामुळे घराब कामगिरीनंतर त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून टीका सहन करावी लागली. राज्यात पक्षाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये तृणमूल काँग्रेसमधून आयात करण्यात आले होते, त्यामुळे या अपयशानंतर सुवेंदू यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या टीकाकारांमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा देकील समावेश आहे. तर काहीजण सांगतात की बंगालमधील आरएसएसच्या नेतृत्व सुवेंदू यांच्यावर खूष नाही कारण त्यांना अद्यापही टीएमसीमधून आयात केलेला नेता म्हणून पाहिले जाते.

“सध्या सुवेंदू अधिकारी हे पक्षाचा चेहरा आहेत, २१२१ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमच्या नेतृत्वाने माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना बाजूला केले. नवीन प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदारही निकाल देऊ शकले नाहीत. केंद्रीय नेतृत्व सध्या सुवेंदू अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवून आहे. ते मोठमोठी भाषणे देत आहेत पण त्याचे परिणाम दिसत नाहीत”, असे एका भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

तर सुवेंदू अधिकारी यांच्या जवळचा ज्येष्ठ नेता म्हणाला की, केंद्रीय पक्ष नेतृत्वाला विरोधी पक्ष नेत्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना पक्ष का पराभूत होतोय तेही माहिती आहे. पण हे असूच सुरू राहिल्यास आणि ही घसरण थांबवली नाही तर त्यांचे स्थान धोक्यात येईल.”

पूर्वा मेदिनीपूर येथील नंदीग्राम येथून सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून सुवेंदूची यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचा प्रभाव संपवण्याचा प्रयत्न करत आहे. २०२२ मध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाने स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारली होती, कोंटाईसह १०८ पैकी १०२ ठिकाणी त्यांनी विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या कट्टर विरोधकाच्या बालेकिल्ल्यात टीएमसीला विजय मिळाला आहे. परंतु प्रत्यक्षात पुढे याचे काय परिणाम होतील हा एक मोठा प्रश्न आहे.

Story img Loader