पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अल्पसंख्याकांना संतुष्ट करणात गुंतल्या आहेत असा आरोप भाजपाचे नेते सुवेन्दु अधिकारी यांनी सोमवारी केला. पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी टीएमसीला मत न देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
नंदीग्राम येथील एका स्थानिक मंदिरात नतमस्तक झाल्यावर अधिकारी यांनी हे वक्तव्य केलं. टीएमसी सुप्रीमोवर टीका करताना ते म्हणाले की, ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याची त्यांना सवय लागली आहे आणि म्हणूनच त्यांनी लोकांना “होली मुबारक” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
“बेगम (बॅनर्जी) यांना मत देऊ नका. जर तुम्ही बेगमला मतदान केले तर येथे मिनी पाकिस्तान होईल. बेगम सुफियानशिवाय इतर कोणालाही ओळखत नाही,” असं ते म्हणाले.
अधिकारी पुढे म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये पराभूत होण्याची भीती वाटत असल्याने बॅनर्जींनी अचानक मंदिरांना भेटी द्यायला सुरूवात केली आहे.
उत्तर प्रदेशच्या कारभाराचा जयजयकार करीत भाजपा नेते म्हणाले की, भाजपा सत्तेत आला तर बंगाल योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या शासनाचा साक्षीदार होईल.
विशेष म्हणजे, मतदान असलेल्या राज्यात गडबड निर्माण करण्यासाठी भाजपाने “उत्तर प्रदेशातील गुंड” आणल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. असेही सांगून अधिकारी यांनी बॅनर्जींवर निशाणा साधला की, पूर्वी त्या गाडीतून प्रवास करत असे, पण आता हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करतात. बॅनर्जींनी परिधान केलेल्या साड्यांवरही त्यांनी भाष्य केले.
“सुवेंदू अधिकारी मध्ये कोणताही बदल झालेला नाही. मी २००४ मध्ये जसे कपडे परिधान केले होते ते आजही बदलले नाही,” अशी तुलना करताना त्यांनी सांगितले की लोकांनी ‘बेगम’ आणि ‘मुलगा, भाऊ आणि मित्र’ यांच्यात निवडा करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, “बेगम हवेतून येते आणि हवेतच गायब होईल.”
दुसर्या टप्प्यातील मतदान नंदीग्राममध्ये १ एप्रिल रोजी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात २९४ जागांसाठी मतदान होणार आहे.