स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील ( discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution ) अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.
हेही वाचा – १६ वर्षीय आदिवासी कन्येची NASA च्या प्रकल्पात वर्णी; Black Hole बाबतचे ‘हे’ संशोधन पाहून वैज्ञानिकही थक्क
कोण आहेत स्वांते पाबो?
स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत.
गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.