बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज हे सध्या बरेच चर्चेत आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना चमत्कार दाखविण्याचा आव्हान दिले होते. त्यानंतर धीरेंद्र महाराज यांनीच त्यांना प्रतिआव्हान दिले. अनेक लोक धीरेंद्र सास्त्री महाराज यांचे समर्थन आणि त्यांना पाठिंबा देत असताना शंकाराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना थेट आव्हान देत तुम्ही जर चमत्कार करणारे असाल तर जोशीमठ येथे येऊन दुभंगत असलेली जमीन जोडून दाखवा, तरच तुम्ही चमत्कारी असल्याचे मानू, असे आव्हान दिले.
काय आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे आव्हान
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, स्वतःची प्रसिद्धी होण्यासाठी कुणी चमत्कारी होण्याचा दावा करत असेल तर त्याला संत मानता येणार नाही. आम्ही देखील संत नाहीत. तुमच्याकडे जर खरंच अलौकिक शक्ती आहे तर मग धर्मांतरण थांबवून दाखवा, गृह क्लेष मिटवा, आत्महत्या थांबवा, जगात शांती प्रस्थापित करा, तरच आम्ही त्याला चमत्कार मानू. तसेच आमच्या जोशीमठमध्ये या आणि जमीन दुभंगली आहे, ती ठिक करा, असे आव्हानच शंकराचार्य यांनी दिले.
…तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी
शंकाराचार्यांनी यावेळी धीरेंद्र महाराजांच्या चमत्काराच्या दाव्यावरही टीका केली. ते म्हणाले, “जर चमत्कार जनतेसाठी होत असतील तरच त्याचा जय-जयकार केला जाऊ शकतो. जर जनतेला चमत्काराचा काहीच लाभ होत नसेल तर मग ती फक्त धुळफेक आहे. जर ज्योतिष शास्त्राच्या आधारे काही अनुमान काढणार असतील, शास्त्राच्या कसोटीवर एखादे वक्तव्य करत असतील तर मग आम्ही त्याला मान्यता देऊ. ज्योतिष शास्त्राचा एक अभ्यास आहे, त्यानुसार आम्ही ज्योतिष शास्त्र सांगत असतो.”
धीरेंद्र कृष्ण महाराजांना ‘तो’ कायदा ठरणार अडचणीचा…
अभाअंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री महाराज यांना आव्हान दिल्यानंतर अनेक राजकीय पुढारी आणि इतर संस्थांनी धीरेंद्र शास्त्रींना पाठिंबा दिला होता. भाजपाचे कैलाश विजयवर्गीय, गिरिराज सिंह, मनोज तिवारी आणि कपिल मिश्रा यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेक हिंदू संघटना देखील धीरेंद्र शास्त्री यांना पाठिंबा देत आहेत.