कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालकीची लिलावात खरेदी केलेली कार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी बुधवारी गाजियाबाद येथील एका फार्म हाऊसवर जाळून टाकली. मुंबईत ९ डिसेंबरला झालेल्या दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात स्वामी चक्रपाणी यांनी दाऊदची कार ३२ हजारांना विकत घेतली होती. कार विकत घेतल्यानंतर ती जाळून टाकण्याचा निर्णय चक्रपाणी यांनी जाहीर केला होता. चक्रपाणी यांना दाऊदची कार एका सार्वजनिक ठिकाणी जाळून टाकायची होती. पण पोलिसांनी त्यास परवानगी नाकारली. अखेर स्वामी चक्रपाणी यांनी बुधवारी गाजियाबादमध्ये एका फार्म हाऊसवर काही मोजक्या जणांच्या उपस्थितीत कार पेटवून दिली. कारवर दाऊदचे फोटो लावून आणि कारच्या चारही बाजूंनी चितेप्रमाणे लाकडं रचून ती जाळण्यात आली. तसेच दाऊदच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा