संयुक्त अरब अमिरातीमधील कारागृहातून आपल्या पुत्राला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी केरळमधील एका केंद्रीय मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला असला तरी या आरोपाबाबत केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना मनस्ताप सहन करावा लागला. आपल्या पुत्रांचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नाही, आपण कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, असा खुलासा थरूर यांना करावा लागला.
केरळमधील एका केंद्रीय मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करून संयुक्त अरब अमिरातीमधील तुरुंगातून आपल्या पुत्राला सहीसलामत बाहेर काढले, असे डॉ. स्वामी यांनी बुधवारी ट्विट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. थरूर यांचे विमानतळावर आगमन होताच त्यांना याबाबत वार्ताहरांनी घेरले. सदर केंद्रीय मंत्री कोण, असा सवालही सातत्याने वार्ताहरांनी थरूर यांना विचारला.
कारागृहातून आपल्या पुत्राला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी केरळमधील कोणत्या मंत्र्याला आपल्या कार्यालयाचा गैरवापर करावा लागला, अमली पदार्थाच्या तस्करीचे आरोप होते का, असे डॉ. स्वामी यांनी ट्विट केले. मात्र डॉ. स्वामी यांनी त्या मंत्र्याचे नाव जाहीर केले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा