वेळीच लक्षात आल्याने अपघात टळला
लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज दिल्लीहून उज्जैनला जात असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जयपूर विमानतळावर तातडीने विमान उतरविण्यात आले.
आज सकाळी उज्जैनला रवाना होताना विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे तत्क्षणी जयपूर येथे आम्हाला उतरावे लागले असे सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटर माध्यमावरून कळविले. त्यानंतर जयपूर येथून दुसऱया विमानाची व्यवस्था करण्यात आली व त्यामार्फत स्वराज इंदौरला पोहोचल्या त्यापुढे स्वराज यांनी उजैनपर्यंत गाडीने प्रवास केला. निर्धारित ठिकाणी पोहोचल्यावर “सर्व काही ठीक आहे, चिंतेची गरज नाही. मी सुखरूप आहे” असे ट्विट केले आहे.

Story img Loader