दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मला मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तसेच राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी केला आहे. ही घटना घडताच त्यांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौकशी सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी १० वाजताच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्टाफकडून स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलीस कंट्रोल रुमला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल होत याप्रकरणी चौकशी सुरू केली. त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल होत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – Arvind Kejriwal on PM Modi: “मोदी पुढील वर्षी निवृत्त होतील, आणि…”, अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी
स्वाती मालीवाल यांनी तक्रार दाखल केली असली तरी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेबाबत अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून किंवा आम आदमी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, याप्रकरणावरून भाजपाने आम आदमी पक्षाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाचे नेते अमित मालविय यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत आपवर टीका केली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या स्टाफकडून मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती, असे ते म्हणाले.
हेही वाचा – मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव, सैन्याला विशेष अधिकार; अरविंद केजरीवालांनी जाहीर केल्या १० गॅरंटी
स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षादेखील राहिल्या आहोत. त्यांना काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाने राज्यसभेवर पाठवले होते. अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू लोकांपैकी एक म्हणून स्वाती मालीवाल यांना ओळखले जाते.