स्वाती मालिवाल यांच्यासह गैरवर्तन झाल्याचं आणि त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी कथित मारहाणीचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांचं पथक स्वाती मालिवाल यांच्या घरी पोहचलं होतं. तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं आहे?
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार १३ मे रोजी काय घडलं तो जबाब नोंदवण्यात आला आहे. स्वाती मालिवाल यांनी जो जबाब नोंदवला त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वाती मालिवाल यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद कुशवाह आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त अंजीता यांच्यासमोर जबाब नोंदवण्यात आला आहे. स्वाती मालीवाल यांच्या जबाबानंतर आता पोलीस या प्रकरणानंतर गुन्हाही नोंदवू शकतात.
प्रकरण काय आहे?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना कथित मारहाण झाली. त्यानंतर वाद सुरु झाला आहे. सोमवारी सकाळी विभव कुमार यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कथित मारहाण प्रकरणात बराच वाद निर्माण झाला आहे. आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी ही बाब समोर आणली आहे.
स्वाती मालिवाल यांचा जबाब नोंदवण्यासाठी घरी पोहचलं पोलिसांचं पथक, महिला आयोगाचं विभव कुमारांना समन्स
संजय सिंह यांनी काय म्हटलं आहे?
संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अरविंद केजरीवाल यांना भेटायला स्वाती मालिवाल गेल्या होत्या. त्या जेव्हा केजरीवाल यांची वाट बघत होत्या तेव्हा विभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरव्यवहार केला आणि कथित मारहाणही केली. या सगळ्या घटनेनंतर आता स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लेखी तक्रार दिली आहे. दिल्ली पोलिसांचं पथक स्वाती मालिवाल यांच्या घरी गेलं होतं तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आज तक ने हे वृत्त दिलं आहे.
स्वाती मालिवाल यांच्या आईने काय म्हटलं आहे?
स्वाती मालिवाल यांच्या आईचं वक्तव्यही समोर आलं आहे. “माझी मुलगी स्वाती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र ही तिची लढाई आहे, माझी मुलगी या सगळ्या विषयावर योग्य वेळी भूमिका मांडेल.” असं त्यांच्या आईने म्हटलं आहे.
भाजपाने काय म्हटलंय?
आपच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीबाबत भाजपाचे गौरव भाटिया म्हणाले, “याबाबतीत अरविंद केजरीवाल यांना यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण ते काही बोलणार नाहीत कारण ते कायर आहेत. मला तर वाटतं आहे की केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. जे काही स्वाती मालिवाल यांच्याबाबत घडलं आहे त्यामुळे देशाच्या महिला वर्गामध्ये प्रचंड राग आहे. महिला हा स्वतःचा अपमान समजत आहेत. यासाठी फक्त केजरीवाल जबाबदार आहेत.”