Greta Thunberg Arrested in Copenhagen University: स्वीडनमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ ग्रेटा थनबर्गनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओसह कोपनहेगनमध्ये नेमकं काय घडलं, यासंदर्भात माहितीही देण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ग्रेटा थनबर्गच्या समर्थनार्थ डेन्मार्कच्या पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या हजारो प्रतिक्रिया व्हिडीओच्या पोस्टवर नेटिझन्सकडून केल्या जात आहेत.

कोपनहेगनमध्ये नेमकं काय घडलं?

बुधवारी डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये ग्रेटा थनबर्ग व इतर काही विद्यार्थी आंदोलन करत होते. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी हमासनं इस्रायलच्या भूमीवर हल्ला केला. त्याविरोधात इस्रायलनं गाझा पट्टी व वेस्ट बँक भागात जोरदार हल्ल चढवला. अजूनही इस्रायलकडून सातत्याने या भागात बॉम्ब हल्ले व जमिनीवरील कारवाया केल्या जात आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ग्रेटा थनबर्ग व इतर काही विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगनमध्ये निषेध आंदोलन करत होते. यावेळी घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ ग्रेटा थनबर्गनं तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल

काय आहे विद्यार्थ्यांची मागणी?

इस्रायलकडून सातत्याने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टी व वेस्ट बँक या भागात हल्ले केले जात आहेत. मात्र, तरीदेखील कोपनहेगन विद्यापीठाकडून इस्रायलमधील विद्यापीठांशी संलग्न कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या मानवसंहारातच सहभाग होत आहे. या पार्श्वभूमीवर कोपनहेगन विद्यापीठानं हे संलग्न कार्यक्रम बंद करावेत, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. त्याचवेळी, इस्रायलच्या कारवायांचा जागतिक स्तरावर निषेध व्हायला हवा, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, ग्रेटा थनबर्गच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यात तिला पोलीस अटक करून घेऊन जात असल्याचं दिसत आहे. या पोस्टमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “आज सकाळी स्टुडंट्स अगेन्स्ट दी ऑक्युपेशन संघटनेच्या विद्यार्थ्यांनी कोपनहेगन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये व रेक्टरच्या कार्यालयातही धरणे आंदोलन केलं. ग्रेटा थनबर्गही आमच्या आंदोलनात सहभागी झाली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच तिला इतर विद्यार्थ्यांसमवेत अटक करण्यात आली”, अशी माहिती ग्रेटा थनबर्गच्या अकाऊंटवरील पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

COP26 : भारताची ग्रेटा थनबर्ग! १४ वर्षीय विनिशा उमाशंकरनं जागतिक परिषदेत जगभरातल्या नेत्यांना सुनावलं!

त्याआधीही एक व्हिडीओ पोस्ट केला असून आपण कोपनहेगन विद्यापीठात कशासाठी आंदोलन करत आहोत, याची माहिती ग्रेटानं व्हिडीओमध्ये दिली आहे. “स्टुडंट्स अगेन्स्ट दी ऑक्युपेशन व मी कोपनहेगन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आंदोलन करत आहोत. पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. त्यांनी खांद्यावर रायफल्स घेऊन दाखल झाले. ते लोकांना इमारतीतून बाहेर काढत आहेत”, असं ग्रेटा या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून डेन्मार्कमध्ये सातत्याने अशा प्रकारची आंदोलनं होत असून इस्रायलच्या कारवायांचा निषेध केला जात आहे.