येथील सिव्हिल रुग्णालयात बुधवारी स्वाइन फ्लूमुळे तीन जण मरण पावले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. राजकोट येथील रहिवासी मुक्ताबेन पटेल, जेतपूर शहरात राहणाऱ्या शारदाबेन पटेल तसेच वानकानेर येथील हसनभाई यांचे बुधवारी सकाळी या व्हायरसजन्य रोगामुळे मरण पावल्याचे सिव्हिल रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. येथील स्वाइन फ्लू कक्षात गेल्या ४८ तासांत एच१एन१ विषाणूची बाधा झाल्याने २० जणांना दाखल करण्यात आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader