जम्मू काश्मीरमध्ये एच१ एन१ विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढले असून तेथील अनेक औषध दुकाने मास्कची विक्री चढय़ा दराने विक्री करीत आहेत. स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी एन ९५ मास्कचा वापर केला जातो.
सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितले की, प्रशासन झोपले आहे. बाजारात एन ९५ मास्क हा त्याची  किंमत १०० रुपये असताना ३०० ते ५०० रुपयांना विकला जात आहे. अनेक दुकानदारांनी मास्कची साठेबाजी केली असून कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याच्या किमती वाढवल्या आहेत. प्रथम ते मास्क नाही असे सांगतात नंतर मास्क आहे पण साडेतीनशे रुपयांना मिळेल असे सांगतात, असे विक्रम मेहता या रहिवाशाने सांगितले. जम्मूतही आरोग्य अधिकाऱ्यांकडे मास्क जास्त दराने विकले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.