राजधानी दिल्लीतील टिळक नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका ३० वर्षीय परदेशी तरुणीचा भयावह अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पीडित तरुणी स्वित्झर्लंडची असून तिचा मृतदेह लोखंडी साखळीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, गुरप्रीत सिंग असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचे एका स्वित्झर्लंडमधील तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. स्वित्झर्लंडमध्ये दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर आरोपी गुरप्रीत तरुणीला भेटायला अनेकदा स्वित्झर्लंडला जायचा. दरम्यान, तरुणीचे अन्य एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी गुरप्रीतला आला. याच संशयातून आरोपीनं पीडितेला भारतात बोलवून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय आल्यानंतर आरोपीनं पीडितेच्या हत्येचा कट रचला. तिला भारतात भेटायला बोलावलं आणि निर्घृण हत्या केली. पीडित तरुणी भारतात आली असता आरोपीनं तिला जादू दाखवण्याच्या बहाण्याने लोखंडी साखळीने तिचे हातपाय बांधले. त्यानंतर तिची भयावह पद्धतीने हत्या केली.

हेही वाचा- क्रूरतेचा कळस! आधी वायरने मारहाण केली मग बलात्कार करून प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड

शुक्रवारी सकाळी टिळक नगर परिसरातील एका सरकारी शाळेजवळ तिचा मृतदेह आढळला. यावेळी तिचे हातपाय लोखंडी साखळीने बांधल्याचे आढळले. तर तिच्या शरीराराचा वरचा भाग काळ्या प्लास्टिकच्या पिशवीने झाकला होता, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये पीडितेचा मृतदेह एका कारमधून आणल्याचं निदर्शनास आलं. कारच्या नोंदणी क्रमांकावरून पोलिसांनी आरोपी गुरप्रीत सिंगचा शोध घेतला आणि तातडीने अटक केली. आरोपीच्या घरातूनही पोलिसांनी सव्वा दोन कोटी रुपयेही जप्त केले आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiss woman murder in delhi limbs tied with metal chain body wrapped in plastic rmm