मुकेश अंबानी,अनिल अंबानी, नरेश गोयल हे उद्योगपती तसेच काँग्रेस खासदार अनू टंडन यांच्यासह अनेकांचे स्वीस बँकेत कोटय़वधी रुपये आहेत, असा गौप्यस्फोट इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते व नवीन राजकीय पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी आज येथे केला. दरवेळी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राजकीय नेते व उद्योगपतींचे पोलखोल करणारे केजरीवाल यांनी यावेळी शुक्रवारचा मुहूर्त निवडला आहे. जीनिव्हातील एचएसबीसी बँकेच्या दहा खातेधारकांच्या यादीवरून आपल्याला काळ्या पैशांबाबत माहिती मिळाली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, एका वरिष्ठ काँग्रेस  नेत्याने ही माहिती आम्हाला पुरवली व नंतर आम्ही एचएसबीसी बँकेकडून त्याची खातरजमा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वीस बँकेत खाती असलेल्यांचा किती काळा पैसा तिथे आहे याचा तपशीलही केजरीवाल यांनी दिला. जीनिव्हातील एचएसबीसी बँकेत एकूण ७०० खातेधारक असून त्यांचा काळा पैसा तेथे असल्याची माहिती सरकारकडेही उपलब्ध आहे. एचएसबीसी बँकेची एक सीडी आम्हाला मिळाली. त्यात डिसेंबर २००६ मध्ये या खात्यांमध्ये असलेल्या रकमांचा उल्लेखही आहे, यादी उपलब्ध असूनही ती सरकारने दडवून ठेवली असे केजरीवाल म्हणाले.
मुकेश अंबानी, अनिल अंबानी व नरेश गोयल तसेच डाबर व बिर्ला समूहाच्या उद्योगपतींची खाती एचएसबीसी बँकेत आहेत, अनू टंडन व संदीप टंडन यांच्या खात्यात १२५ कोटी रुपये आहेत. संदीप टंडन हे माजी महसूल अधिकारी असून त्यांनी रिलायन्सवर छापा टाकला होता. जुलै २०११ मध्ये भारत सरकारला जीनिव्हातील एचएसबीसी बँकेत खाती असलेल्या ७०० जणांची यादी मिळाली होती. त्यात २००६ पर्यंत खात्यावर असलेल्या रकमांचा उल्लेख आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
 जेव्हा सातशे स्वीस खातेधारकांची नावे सरकारला मिळाली त्यानंतर मुकेश अंबानी हे अर्थमंत्रालयात आले होते व त्यांनी या पैशांवर कर भरण्याची आमची तयारी आहे कृपया छापे टाकू नका अशी विनंती त्यांनी त्यावेळी केली, असे केजरीवाल म्हणाले.
सध्याच्या सीबीआय संचालकांनी असे सांगितले होते २५ लाख कोटी रुपये इतका काळा पैसा परदेशात पडून आहे. त्यातील सहा हजार कोटी रुपये स्वीस बँकेत आहेत.भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वाला काळा पैसा हा मोठा धोका आहे, केंद्र सरकार या काळ्या पैसेवाल्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप करून केजरीवाल म्हणाले की, दोषी व्यक्तींना शिक्षा करण्याऐवजी त्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. माजी अर्थमंत्री व सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तर स्वीस बँकेतील ७०० जणांना माफी देण्याची योजनाही आखली होती. एचएसबीसी बँकेतील पैसा हा दहशतवाद, भ्रष्टाचार यासाठी वापरला जातो असा आरोप केजरीवाल यांनी केला.
 आपल्या देशात काम करणाऱ्या सर्व परदेशी बँकांना अमेरिकेप्रमाणे त्यांच्या खातेधारकांची यादी जाहीर करणे अनिवार्य केले पाहिजे. एचएसबीसी बँकेच्या हजारो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडून द्याव्यात असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल हे दरवेळी बुधवारी पोलखोल पत्रकार परिषद घेतात पण आज त्यांनी ती शुक्रवारी घेतली. यापूर्वी त्यांनी रॉबर्ट वढेरा, नितीन गडकरी , मुकेश अंबानी यांचा भ्रष्टाचार व गैरकृत्यांचा पर्दाफाश केला आहे.     

काला रे, धन काला रे..
 मुकेश धीरुभाई अंबानी – १०० कोटी रुपये
अनिल धीरुभाई अंबानी – १०० कोटी रुपये
मोटेक सॉफ्टवेअर प्रा. लि. (रिलायन्स समूह) – २१०० कोटी रु.
रिलायन्स इंडस्ट्रीज लि.- ५०० कोटी रु.
संदीप टंडन- १२५ कोटी रुपये
अनू टंडन- १२५ कोटी रुपये.
कोकिलाबेन अंबानी- खाते.  पण रक्कम माहीत नाही.
नरेश गोयल- ८० कोटी रुपये.
बर्मन्स (तीन कौटुंबिक सदस्य) २५ कोटी
यशोवर्धन बिर्ला- रक्कम नाही.

यादी मिळताच मुकेश अर्थमंत्रालयात हजर, कर भरतो, छापे टाकू नका अशी विनवणी
तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी काळेपैसेवाल्या ७०० खातेधारकांना माफी देण्यास होते तयार

प्रणव मुखर्जीवर आरोप
जुलै २०११ मध्ये फ्रान्स सरकारकडून भारताला ही यादी मिळताच आयकर विभागाने संबंधितांवर धाडी घालणे सुरू केले. मात्र, अंबानी बंधूंसह स्विस बँकेत मोठय़ा रकमा असलेल्या बडय़ांची घरे शाबूत राहिली. मुकेश अंबानी यांनी तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांची भेट घेऊन संभाव्य धाडी रोखण्याची विनंती केल्याचे म्हटले जाते, असाही दावा केजरीवाल यांनी केला. स्विस बँकेत मोठय़ा प्रमाणावर पैसा जमा करणाऱ्यांच्या मदतीसाठी मुखर्जी यांचा स्वैच्छिक संपत्ती घोषणा योजना (व्हीडीआयएस) आणण्याचाही विचार होता, असेही ते म्हणाले.