स्वित्र्झलडकडून काळ्या पैशाच्या बँक खात्यांची माहिती मिळण्यास २०१८ हे वर्ष उजाडणार आहे. स्वयंचलित माहिती हस्तांतर यंत्रणेत ही माहिती भारताला मिळणार आहे. ज्या देशांनी या यंत्रणेचा स्वीकार केला आहे त्यांच्यासाठी २०१६ मध्ये प्रथम माहिती गोळा केली जाणार असून ती सप्टेंबर २०१७ पर्यंत हस्तांतरित केली जाईल, असे स्विस सरकारने म्हटले आहे.  २०१७ मध्ये ५८ देश पहिल्यांदा माहितीचे आदानप्रदान करतील व त्यानंतर  २०१८ मध्ये आणखी एक आदान प्रदान होईल.

Story img Loader