Syria Civil War Updates : सीरियात सत्तापालटाच्या हालचालींनी वेग घेतला असून, देशातील अनेक शहरे बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. राष्ट्राध्यक्ष असद अल बशर देश सोडून रशियाला पळून गेल्याचे वृत्त आहे. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये सर्वात मोठा हल्ला करण्यात आला असून, तिथे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यावेळी बंडखोरांनी देशाच्या लष्कराचे रणगाडेही ताब्यात घेतले असून, ते आता राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बशर सरकारचे एक विमान सीरियात घिरट्या घालताना दिसले, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, असद त्यांच्या कुटुंबासह त्या विमानातून परदेशात गेले आहेत. मात्र सरकारी सूत्रांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. असद आपली जबाबदारी पार पाडत आहेत. देशवासियांना सोडून ते कुठेही जाणार नाहीत असे म्हटले आहे.

बंडखोरांच्या बाजूने लोक रस्त्यावर

सीरियातील परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे कारण आता सरकारच्या ताब्यातील भागही बंडखोरांनी त्यांच्या ताब्यात घेतले आहेत. वृत्तानुसार, बंडखोरांनी आता उत्तर आणि पूर्व होम्समधील अनेक सरकारी सीमा उद्ध्वस्त केल्या आहेत. होम्स शहरातून सैन्य माघार घेतल्यानंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यानंतर त्यांनी “असाद गेले, होम्स मुक्त झाले” अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.

आता त्यांची राजधानीला वेढा घालण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय, सीरियातील सर्वात कुख्यात तुरुंग सैदनायामधून कैद्यांना सोडण्याचा कट रचला जात असल्याचेही वृत्त आहे. विरोधी पक्षाचे अनेक नेतेही या तुरुंगात असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना दिलासा; यून सुक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव नामंजूर

राष्ट्राध्यक्षांचे कुटुंब रशियात

या सर्व गोंधळात असद यांचे कुटुंब आधीच देश सोडून पळून गेले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राष्ट्राध्यक्षांचे कुटुंब सध्या रशियातील रोस्तोव्हमध्ये असून तेथे त्यांनी एक घरही खरेदी केले आहे. त्या ठिकाणी असद स्वतः कधीही निघून जाऊ शकतात.

हे ही वाचा : सीरियात बंडखोरांची आगेकूच; देशाच्या दक्षिण भागातून लष्कराची माघार

कोण आहे अबू मोहम्मद अल जोलानी?

अबू मोहम्मद अल जोलानी हा या सीरियातील या बंडाचा सूत्रधार आहे. त्याने स्वत: आपले सैन्य रस्त्यावर उतरवले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शहरे काबीज करत आहे. त्याचे कारनामे इतके धोकादायक आहेत की, अमेरिकेनेही त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syria coup attempt latest updates bashar al assad aam