सीरियातील अल्लेप्पो शहरावर लष्कराने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. वर्ष २०११ मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धातील आतापर्यंतचे लष्कराचे हे सर्वाधिक मोठे यश आहे. शहराला बंडखोरांपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आल्यानंतर सीरियाच्या लष्कराकडून ही घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर गेल्या एक महिन्यांपासून पूर्व अलेप्पोमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्षही संपुष्टात आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या सीरियन बंडखोरांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. या आंदोलनात आतापर्यंत ३ लाख १० हजार लोक मारले गेले आहेत.
Syrian military says Aleppo has returned to government control, ending 4-year rebel hold over parts of city:AP
— ANI (@ANI_news) December 22, 2016
तत्पूर्वी रेडक्रॉसने चार हजार बंडखोरांनी शहर सोडल्याचे म्हटले होते. गेल्या सहा वर्षांपासून बंडखोर आणि लष्करात सुरू असलेल्या या चकमकीत पूव अलेप्पोचे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान गत एक महिन्यात झाले होते. त्याचबरोबर सीरियन लष्कराने देशातील पाच प्रमुख शहर अलेप्पो, होम्स, हमा, दमिश्क आणि लताकिया या शहरांवर नियंत्रण मिळवले आहे.
राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हा मोठा विजय आहे. तर त्यांच्या विरोधात असलेल्या सौदी अरब, कतार आणि काही पश्चिमात्य देशांसाठी हा पराभव असल्याचे मानले जाते. या रक्तरंजित संघर्षांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष करून रशिया आणि अमेरिकेत या विषयावरून विस्तव जात नव्हता.
अलेप्पोच्या स्वातंत्र्यांसाठी सीरियाच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी या दहशतवादाविरोधात आपले योगदान दिले आहे. त्या प्रत्येकाचे आपले योगदान आहे. विशेषत: रशिया आणि इराण यांचे महत्वाचे योगदान होते, असे स्टेट न्यूज एजन्सीने (सना) राष्ट्राध्यक्ष असद यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
हिमवर्षाव व थंडीमुळे येथील शहरे रिकामी करण्यास अडचणी येत आहेत. विस्थापितांना बसमध्येच तासन्तास वाट पाहावी लागत आहे. शहर रिकामे करण्याच्या शेवटच्या टप्प्यात बुधवारी व गुरूवारी रात्रीार चाललेल्या मोहिमेत सुमारे चार हजाराहून अधिक मुलांना कार, व्हॅनमधून पूर्व अलेप्पोतून शोधून काढण्यात आल्याचे रेडक्रॉसच्या प्रवक्त्याने सांगितले. या संपूर्ण अभियानात आतापर्यंत सुमारे ३४ हजार लोग अलेप्पोच्या हिंसाचाराने प्रभावित भागातून बाहेर काढण्यात आल्याचेही त्याने म्हटले.
गत एक महिन्यांपासून बंडखोर आणि सीरियन सैन्यात तीव्र संघर्ष सुरू होता. अखेर २०१२ पासून अलेप्पोवर ताबा असलेल्या बंडखोरांनी माघार घेतली. यामुळे राष्ट्राध्यक्ष असद यांचा हा मोठा विजय असल्याचे मानले जाते.