एपी, बैरुत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीरियाच्या लष्कराने शनिवारी देशाच्या दक्षिणेकडील बहुतेक भागातून माघार घेतली असून तो भाग अध्यक्ष बशर असाद यांच्याविरोधात उठाव करणाऱ्या बंडखोरांनी ताब्यात घेतला आहे अशी माहिती लष्कराने दिली. सध्या बंडखोरांनी अलेप्पो आणि हमा या दोन शहरांवर नियंत्रण मिळवले असून त्याशिवाय होम्स हे महत्त्वाचे ऐतिहासिक शहरही त्यांच्या ताब्यात आले आहे.

लष्कराने दारा आणि स्वेडा या प्रांतांमधून माघार घेऊन ते सैन्य होम्सच्या रक्षणासाठी पाठवले. मात्र, बंडखोरांनी होम्सचा बराचसा भागही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सीरियामधील युद्धावर देखरेख ठेवणाऱ्या ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ या संस्थेचे अध्यक्ष रामी अब्दुररहमान यांनी शनिवारी माहिती दिली की, ‘‘इराणच्या लष्करी सल्लागारांनी सीरिया सोडायला सुरुवात केली आहे. तर पूर्व सीरियामध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून येणारे आणि इराणच्या पाठिंब्याने लढणारे बंडखोर आता मध्य सीरियामध्ये गेले आहेत.’’

हेही वाचा >>>बांगलादेशात इस्कॉन केंद्राची जाळपोळ

सीरियामधील बंडाला गुरुवारपासून अधिक बळ मिळाले असले तरी त्याला सुरुवात २७ नोव्हेंबरपासून झाली. हयात तहरिर अल-शम या जिहादी संघटनेने हे बंड पुकारले. या संघटनेची मुळे अल-कायदामध्ये असून अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. असाद यांची सत्ता उलथवून लावणे हे आपले ध्येय असल्याचे या संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल गोलानी याने ‘सीएनएन’ला गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

हेही वाचा >>>अदानींच्या फायद्यासाठी वीजबिलात वाढ; काँग्रेसप्रणीत ‘यूडीएफ’चा केरळ सरकारवर आरोप

एकाकी असाद

सीरियातील बंड अध्यक्ष असाद यांच्यासाठी अनपेक्षित असून त्यांचे पूर्वीचे इराण आणि रशिया हे समर्थक देश इतरत्र व्यग्र आहेत. २०११मध्ये ‘अरब स्प्रिंग’मध्ये सीरियामध्ये झालेल्या बंडाळीदरम्यान रशिया आणि इराणने त्यांना पाठिंबा दिला होता. आता रशिया युक्रेनबरोबर युद्धात गुंतलेला आहे. इस्रायलबरोबर संघर्षामुळे इराणचे नेतृत्व त्रस्त आहे. तर, लेबनॉनमधील शक्तिशाली हेजबोला गट आता अस्तित्वाची लढाई लढत आहे.

घडामोडींचे सत्र

हयात तहरिर अल-शम या जिहादी संघटनेचे बंड

सत्ता उलथवण्याचा संघटनेचा निर्धार

बंडखोर राजधानी दमास्कसपासून ५० किमी अंतरावर

असाद यांच्या कार्यालयाकडून राजधानी सोडल्याच्या अफवांचे खंडन

इराण, रशिया आणि तुर्कीये चर्चा करणार

सत्ता संक्रमण सुरळीत होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची बैठक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syrian army withdrew from most of the country south on saturday amy