सिरियातील मनबीज शहरातील महिलांनी आपले बुरखे जाळून तर पुरूषांनी आपली दाढी काढून व नृत्य करून इसिसच्या बंधनातून मुक्त झाल्याचा आनंद साजरा केला. गत दोन वर्षे हे शहर इसिसच्या ताब्यात होते. इसिसने येथील बंडखोर गटांशी लढताना दोन हजार निष्पाप नागरिकांना आपली ढाल बनवली होती. इसिल या बंडखोर गटाने एक महिना इसिसशी लढा देऊन येथील नागरिकांना मुक्त केले. त्यामुळे तब्बल दोन वर्षांपासून नरक यातना भोगणाऱ्या नागरिकांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला.
मनबीज शहरावर इसिसने दोन वर्षांपासून ताबा मिळवला होता. येथील नागरिकांवर त्यांनी शरिया कायदयानुसार राहण्याची सक्ती केली होती. महिलांनी बुरख्याशिवाय बाहेर पडायचे नाही तसेच पुरूषांना दाढी वाढवण्याची सक्ती करण्यात आली होती. शहरातील अनेक इमारती बेचिराख झाल्या होत्या. इसिल या बंडखोर गटाने इसिसचा पराभव केल्यानंतर येथील नागरिक रस्त्यावर उतरून आपला आनंद व्यक्त करत होते. नागरिकांनी एकमेकांना अलिंगन देऊन, सिगारेट पीत नृत्य केले. अनेक महिलांनी आपला बुरखा जाळला. तर पुरूषांनी आपली दाढी काढली. मुले टाळ्या वाजवत होते. नागरिक बंडखोर सैनिकांना आनंदाने अलिंगन देत होते. त्यांच्या चेहरयावर स्वातंत्रयाचा आनंद दिसत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा