सत्य, संवाद व अहिंसा या संकल्पना रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी जगाला दिल्या व तोच जागतिक समुदायापुढे असलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाचा मुकाबला करण्याचा एक मार्ग आहे असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितले.
उपासना विद्यापीठात बोलताना त्यांनी सांगितले की, दहशतवादाला धर्माचा आदर नसतो, सीमा नसतात, राष्ट्रीयत्व नसते. विनाश एवढा एकच हेतू त्यात असतो. आज जगापुढे दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. शाश्वत शांतता मिळवण्यासाठी मानवतेची नैतिक व बौद्धिक वचनबद्धता महत्त्वाची आहे. केवळ राजकीय व आर्थिक करार करून शाश्वत शांतता मिळणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा