भारताचे नोबेल विजेते कवी रबींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे चुकीचे व अश्लील भाषांतर चिनी भाषेत करण्यात आले होते, ते माघारी घेण्यात आले आहे. स्ट्रे बर्ड्स या अभिजात काव्यसंग्रहाचे भाषांतर झेजियांग वेन्यी पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले होते, पण आता ते पुस्तक मागे घेण्यात आले असून संकेतस्थळावरूनही मजकूर काढला आहे. यात सांस्कृतिक दहशतवाद असून अभिजात कलाकृतीची निंदाही करण्यात आल्याचा आरोप होता. फेंग तांग या प्रसिद्ध चिनी लेखकाने हे भाषांतर केले होते, पण त्यात चुकीचे अर्थ लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यातील भाषाही अश्लील असल्याचे सांगण्यात आले. चीनमधील सिना वेबो संकेतस्थळावर हे भाषांतर ईश्वरनिंदा करणारे असल्याचे म्हटले होते. फेंग यांनी या भाषांतराबाबत पश्चात्ताप व्यक्त केला नसून इतिहासच आपले मूल्यमापन करील असे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in