राज्यपालांच्या परवानगीविना १७ कोटी रुपयांच्या ताज मार्गिका प्रकल्पाला परवानगी देण्याचे प्रकरण उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवती यांना गोत्यात आणणार असल्याची चिन्हे आहेत़  या घोटाळ्यात मायावती यांच्याविरुद्धही खटला चालविण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आह़े
मायावती यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची मागणी करणाऱ्या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या़  उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती़  या याचिकेवर सुनावणी करताना, ‘हे प्रकरण आम्ही अभ्यासू,’ असे सांगत न्या़  एच़  एल़  दत्तू आणि राजन गोगोई यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेतली़

Story img Loader