जगातील तीन सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळांमध्ये भारतामधील ताजमहलचा समावेश करण्यात आला आहे. जगभरातील पर्यटकांनी ताजमहल सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. ट्रिप अॅडव्हायजर्स-२०१३ पर्यटकपसंती नामांकनानुसार, जगातील सर्वोत्कृष्ट २५ पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये ताजमहलला तिसरे स्थान देण्यात आले आहे.   
पेरुमधील माचू पिच्चू आणि कंबोडियामधील अंगकोर वॅट या दोन स्थळांनी या यादीमध्ये अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळविले आहे.  या पर्यटनस्थळावर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि स्थळाची गुणवत्ता लक्षात घेऊन क्रमवारी ठरविण्यात आल्याचे ट्रिप अॅडव्हायजर्स कंपनीने स्पष्ट केले आहे.   
याआधीच ताजमहालचा वास्तुकौशल्य आणि सुंदरतेसाठी जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात.

Story img Loader