जगातील तीन सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळांमध्ये भारतामधील ताजमहलचा समावेश करण्यात आला आहे. जगभरातील पर्यटकांनी ताजमहल सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. ट्रिप अॅडव्हायजर्स-२०१३ पर्यटकपसंती नामांकनानुसार, जगातील सर्वोत्कृष्ट २५ पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये ताजमहलला तिसरे स्थान देण्यात आले आहे.
पेरुमधील माचू पिच्चू आणि कंबोडियामधील अंगकोर वॅट या दोन स्थळांनी या यादीमध्ये अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळविले आहे. या पर्यटनस्थळावर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि स्थळाची गुणवत्ता लक्षात घेऊन क्रमवारी ठरविण्यात आल्याचे ट्रिप अॅडव्हायजर्स कंपनीने स्पष्ट केले आहे.
याआधीच ताजमहालचा वास्तुकौशल्य आणि सुंदरतेसाठी जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा