Taj Mahal tops ticket sale : आग्रा येथील ऐतिहासिक महत्त्व असलेले मुघलकालीन वास्तू ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. हे प्रेक्षणीय इमारत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण म्हणजे ताजमहाल हे गेल्या पाच वर्षात तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे एएसआय-संरक्षित ऐतिहासिक वास्तू ठरली आहे. सरकारने सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

राज्यसभेत लिखित स्वरुपात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला गुरूवारी उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शिंह शेखावत यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

आर्किलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय)ने गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तु पाहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून तिकिटांच्या रुपात किती रक्कम गोळा केली, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये वार्षिक आणि ऐतिहासिक स्थळांनुसार वर्गवारी मागणी करण्यात आली होती. याबरोबरच गेल्या पाच वर्षात तिकिटांच्या विक्रीतून सर्वाधिक उत्पन्न मिळालेल्या ऐतिहासिक वास्तुबद्दलही विचारण्यात आले होते.

या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्र्‍यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षांमधील सर्व माहिती जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ताजमहाल पाचही वर्ष या यादीमध्ये अव्वल स्थानावर राहिले आहे.

मुघलकालीन स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण असलेला ताजमहल हा १७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. ताजमहल ही जगातील सर्वात सुंदर इमारतींपैकी एक मानली जाते. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये, आग्रा येथील आग्रा किल्ला हा दुसऱ्या तर दिल्लीतील कुतुब मिनार हा तिसर्‍या स्थानावर होता.

तर आर्थिक वर्ष २०२०-२१ या काळात तमिळनाडू येथील मामल्लापुरम आणि सूर्य मंदिर, कोणार्क हे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानांवर होते. तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कुतुब मिनार आणि दिल्लीतील लाल किल्ला हे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर होते.