ताजमहालाची निर्मिती बादशहा शाहजानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठी केली होती. आग्रा येथे असलेला ताजमहाल म्हणजे तेजो महाल किंवा शंकराचे मंदिर नाही असा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागाने लेखी स्वरूपात कोर्टात सादर केला आहे. ताजमहाल या वास्तूला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा या ठिकाणी येत असतात.

मात्र २०१५ मध्ये सहा वकिलांनी आग्रा कोर्टात एक याचिका दाखल केली होती ज्या याचिकेत ताजमहाल हे पूर्वी शंकराचे मंदिर होते, त्याचमुळे या परिसरात आरती करण्याची परवानगी द्यावी असे नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर ताजमहालात काही खोल्या बंद आहेत त्या उघडण्यात याव्या अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याच याचिकेवर भारतीय पुरातत्त्व खात्याचे म्हणणे काय आहे हे कोर्टाने जाणून घेतले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. ताजमहालाची वास्तू ज्या परिसरात उभी आहे त्याच परिसरात एक मशीद आहे. या मशिदीत दर शुक्रवारी बडी नमाज अदा होते. त्याच पार्श्वभूमीवर ६ वकिलांनी ताजमहालाच्या परिसरात आरती करण्याचीही परवानगी मागितली आहे.

केंद्रीय पुरातत्त्व खाते आणि पुराणवस्तू खात्याकडे देशातल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचमुळे ताजमहालाच्या संदर्भातली याचिका कोर्टापुढे आली तेव्हा कोर्टाने भारतीय पुरातत्त्व खात्याकडे उत्तर मागितले याच याचिकेला उत्तर देताना, ताजमहाल ही वास्तू शहाजानने बांधली असून त्याजागी आधी मंदिर होते किंवा या वास्तूचे नाव तेजोमहाल होते असे कोणतेही पुरावे मिळत नाहीत असे म्हटले आहे.

सतराव्या शतकात बादशहा शाहजान याने त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठी या वास्तूची निर्मिती केली आहे असेही पुरातत्त्व खात्याने म्हटले आहे. एवढेच नाही तर २०१५ मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानेही ताजमहालाच्या जागी शंकराचे मंदिर होते किंवा या वास्तूचे नाव तेजो महाल होते असे कोणतेही पुरावे मिळत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Story img Loader