गेल्या काही दिवसांपासून जगभरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. टर्की, चीन, नेपाळनंतर आता ताजिकिस्तान आणि अफागाणिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ताजिकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीदेखील भूकंपाचा धक्का बसला होता.
हेही वाचा – ५.६ रिश्टर स्केलच्या तीव्रेतेनं टर्की पुन्हा हादरलं; एकाचा मृत्यू, ६९ जखमी
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताजिकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. ताजिकिस्तानबरोबरच अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. पहाटे ४ च्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या भूंकपाचे केंद्र ताजिकिस्तान-अफागाणिस्तान सीमेजवळ असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – तुर्कस्तानमध्ये पुन्हा भूकंप; आणखी काही इमारती उद्ध्वस्त
दरम्यान, गेल्या आठवड्यातही ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. यूएस जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपाच्या काही तासानंतरच चीन-ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांग प्रांतातही भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती.