इस्लामाबाद : तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातील गैरव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. ‘‘दिवसा माश्या आणि रात्री कीटकांचा प्रादुर्भाव असलेल्या कोठडीत मला राहायचे नाही. अटक तुरुंगातून बाहेर काढावे,’’ अशी विनंती इम्रान खान यांनी त्यांच्या वकिलांकडे केली आहे. इस्लामाबाद सत्र न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर इम्रान यांना शनिवारी अटक करण्यात आली. खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिक्षेला आव्हान दिले. त्यांना अटक तुरुंगात ठेवण्यात आले असून तुरुंगातील असुविधेबाबत त्यांनी नाराजी व चिंता व्यक्त केली. इम्रान यांच्या वकिलांनी तुरुंगाधिकाऱ्यांची भेट घेऊन कोठडीतील गैरव्यवस्थेबाबत तक्रार केली. माजी पंतप्रधानांना ‘क’ दर्जाची सुविधा प्रदान करून अत्यंत कष्टजनक परिस्थितीत ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
‘कीटकांचा वावर असलेल्या कोठडीत राहायचे नाही!’ इम्रान खान यांची तुरुंग प्रशासनाकडे तक्रार
माजी पंतप्रधानांना ‘क’ दर्जाची सुविधा प्रदान करून अत्यंत कष्टजनक परिस्थितीत ठेवण्यात आले आहे,
First published on: 10-08-2023 at 03:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take me out of this jail full of flies and insects imran khan complaint to jail administration zws