Premium

दुसरा मोदी तयार होऊ नये याची काळजी घेतोय – शरद पवार

‘मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही’

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

दुसरा मोदी तयार होऊ नये याची काळजी घेतोय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. नरेंद्र मोदींनी शरद पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो असे विधान बारामतीत केले होते. त्याच वक्तव्याचा आधार घेत शरद पवारांनी म्हटलं की, ‘मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत आहे’. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटलं की, ‘मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये याची काळजी मी घेत आहे. वर्ध्यातील सभेत बोलताना त्यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणं होतात असं ते म्हणाले. राजकारणात वैयक्तिक टीका करायची नाही असा नियम आहे. दिल्लीत मला भेटतील तेव्हा मोदींना मी यासंबंधी विचारणार आहे’.

याआधी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात शरद पवार यांचा हात पकडून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा धागा पकडत शरद पवार यांनी ‘बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात शरद पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आता मला या वाक्याची भीती वाटते. पंतप्रधान संसदेत भेटतात तेव्हा ते हात पुढे करतात. पण माझ्या करंगळीचे काय होईल, या भीतीने हातात हात देण्याऐवजी कोणाशी ही हात मिळवत नाही. त्यामुळे आता माझ्या बोटाची चिंता वाटते. आता थेट हात जोडून नमस्कार करतो,’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, ‘देशात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने अनेक आश्वासने दिली. पण ही आश्वासन पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा विरोधात अनेक ठिकाणी प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. तर ज्या ज्या वेळी देशात भाजपा सरकार आले. तेव्हा देशावर हल्ले झाले आहेत,’ अशा शब्दात सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली.

‘देशामध्ये आज वेगळी स्थिती आहे. हे पाहून आजचे सत्ताधारी यापुढे निवडणूक होणार नाही. यासाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. काही जण सांगतात की, ही शेवटीची निवडणूक आहे. पण हे मला मान्य नाही.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

मोदी हे वागणं बरं नव्हं : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात सभा घेतली. त्यावेळी आमच्या घराला त्यांनी लक्ष केले. माझ्या घराची चिंता त्यांना पडली आहे. त्यांना काय माहीत माझ्या मुलीचे लग्न झाले आहे. तुम्हाला घरचा काय अनुभव आहे का, असा सवाल उपस्थित करीत मोदी हे वागणं बरं नव्हे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. तर निवडणुकीनंतर ते काही राहत नाही. देशात वातावरण बदल असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taking care that another modi will not born says sharad pawar

First published on: 08-04-2019 at 09:15 IST