इस्लाम आणि पवित्र ग्रंथ कुराणचा अपमान केल्याप्रकरणी तालिबानने एका प्रसिद्ध फॅशन मॉडेलला अटक केली आहे. अजमलसोबत त्याच्या तीन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. अफगाणिस्तान सरकारने यासंबंधी व्हिडीओ प्रसिद्ध करत माहिती दिली. ट्विटरला पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत अटक करण्यात आलेल्या अजमलच्या हातात बेड्या दिसत आहेत. तालिबानच्या गुप्तचर विभागाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “पंतप्रधानांनी हे विष…”

अजमल हा आपल्या फॅशन शो, युट्यूब व्हिडीओ तसंच मॉडेलिंग कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. अजमलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो आपल्या सहकाऱ्यासोबत विनोदी पद्धतीने कुराणमधील आयातचं वाचन करत आहे. गुलाम सखी बोलताना अडखळतो आणि याचा वापर तो विनोदासाठी करत असतो.

Maharashtra Breaking News Live: राज्यसभेची निवडणूक ते औरंगाबादसभेवरुन आरोप प्रत्यारोप;  क्षणोक्षणीच्या अपडेट्स एकाच क्लिकवर

अटकेची कारवाई केल्यानंतर तालिबानने अजमल आणि त्याच्या सहकाऱ्यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तिघे जेलमधील कपड्यांमध्ये दिसत असून तालिबान सरकार आणि धर्मगुरुंची माफी मागत आहेत. प्रेषित मोहम्मद आणि कुराणमधील आयातचा अपमान करण्याची कोणालाही परवानगी नाही असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे.

तालिबानने याप्रकरणी अधिकृतपणे भष्य करण्यास नकार दिला आहे. तसंच अजमल आणि त्याच्या सहाकऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे हे स्पष्ट केलेलं नाही.