पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील कारागृहात अटकेत असलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी सोमवारी रात्री या कारागृहावर तालिबान्यांनी हल्ला केला. बॉम्ब, रॉकेट यांच्या साह्याने तालिबान्यांनी या कारागृहावर हल्ला करून तेथे डांबून ठेवलेल्या दहशतवाद्यांची सुटका केली.
वायव्येकडील खैबर पख्तुंख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खानमधील मध्यवर्ती कारागृहावर तालिबान्यांनी रात्रीच्यावेळी हल्ला चढविला. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ल्यामध्ये १०० दहशतवादी सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये काही आत्मघाती दहशतवाद्यांचाही समावेश होता, असे या संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. या कारागृहात पाच हजार कैद्यांना ठेवण्याची सोय आहे. त्यामध्ये सुमारे २५० कैदी हे दहशतवादी आहेत.
दहशतवाद्यांचा हल्ला परतावून लावण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते, अशी माहिती खैबर पख्तुंख्वामधील सरकारचे प्रवक्ते शौकत युसूफझई यांनी दिली.

Story img Loader