अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने रशिया-युक्रेन संकटावर एक विधान शेअर केले आहे आणि दोन्ही बाजूंना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच इतर राष्ट्रांनाही हा संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यात मदत कऱण्याचं आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अफगाणिस्तान युक्रेनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करते. अफगाणिस्तानने दोन्ही पक्षांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व बाजूंनी हिंसाचार तीव्र करू शकणारी भूमिका घेण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे.

तालिबान सरकारने युक्रेन आणि रशियाला संवाद आणि शांततापूर्ण मार्गाने संकट सोडवण्याचं आवाहन केलं. काही महिन्यांपूर्वी इस्लामी अतिरेक्यांनी असाच लष्करी हल्ला करून अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सत्ता काबीज केली होती. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता कारण २० वर्षांनंतर अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतर अश्रफ घनी यांचे निवडून आलेले सरकार कोसळले होते.

दरम्यान, युक्रेनमधील संघर्षात किमान १९८ लोकांचा मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. युक्रेनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे.