अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील अध्यक्षीय प्रासादावर मंगळवारी तालिबान्यांनी शक्तिशाली हल्ला केला. प्रासादाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर सुमारे सहा स्फोट घडवून आणण्यात आले. त्याचबरोबर जवळपास पाऊणतास प्रवेशद्वाराजवळ गोळ्यांच्या फैरी झडत होत्या. काबूलमधील सर्वांत सुरक्षित ठिकाणावर आम्ही हल्ला करून दाखवला, असे तालिबानने म्हटले आहे.
तालिबानने केलेला हल्ला हा आत्मघाती होता. हल्ल्यानंतर अध्यक्षीय प्रासादाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारापासून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहेत. आम्ही शत्रूला मारले, असा संदेश तालिबानने या हल्ल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून दिला. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हामिद करझाई यांच्या पत्रकार परिषदेसाठी काही पत्रकार प्रासादाजवळ आले होते. त्यांनी या ठिकाणी सात ते आठ शक्तिशाली स्फोट झाल्याचे सांगितले.
अध्यक्षीय प्रासादाच्या परिसरातच अमेरिकेचा दूतावास असून, नाटोच्या सैन्याचे मुख्यालयही तिथेच आहे. त्यामुळेच तालिबानने या ठिकाणाला लक्ष्य केल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2013 रोजी प्रकाशित
अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय प्रासादावर तालिबान्यांचा हल्ला
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील अध्यक्षीय प्रासादावर मंगळवारी तालिबान्यांनी शक्तिशाली हल्ला केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-06-2013 at 10:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban claim responsibility for attack near afghan presidential palace