अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी एक एक करत शहरांवर ताबा मिळवत आहे. आता तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच देशातील सर्वच सीमा ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच लोकांमध्ये दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे.
तालिबानने सत्ता परिवर्तन करण्याची मागणी केली आहे. त्यावर अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. “काबुलवर हल्ला होणार नाही. सत्ता परिवर्तंन शांततापूर्वक मार्गाने होईल.”, असं गृहमंत्री मिर्जकवाल यांनी टोलो न्यूजला सांगितलं, दुसरीकडे तालिबानंही जबरदस्तीने काबुल ताबा मिळवणार नाही असं सांगितलं आहे. सर्वांना सत्ता परिवर्तन हवं आहे. सत्ता परिवर्तन शांततेत झालं, तर कोणतंही नुकसान होणार नाही, असं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.
The Taliban have begun entering the Afghan capital Kabul from all sides, the Afghan interior ministry said on Sunday: Reuters pic.twitter.com/LYsCBviOHk
— ANI (@ANI) August 15, 2021
यापूर्वी शनिवारी तालिबाननं जलालाबादवर ताबा मिळवला होता. यानंतर काबुल शहरच उरलं होतं. काबुल हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानलं जातं होतं. मात्र आता या शहरावरही तालिबानने कुच केली आहे. जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबुलला देशाच्या पूर्व भागापासून वेगळं केलं होतं. जलालाबादच्या राज्यपालांना कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केलं होतं. सामान्य नागरिकांचं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी असं केलं आहे.
“…तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावं लागेल”; सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
अफगाणिस्तानला लागून असलेल्या तोरखम सीमेवर पाकिस्ताननं कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. अपगाणिस्तानातील स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी सांगितलं., अफगाण पोलिसांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यामुळे सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं शेख राशिद अहमद यांनी सांगितलं आहे.