अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे तालिबानी अतिरेक्यांनी तपासणी नाक्यांवर हल्ले करून वीस पोलीस अधिकाऱ्यांना शुक्रवारी ठार केले. दक्षिण हेल्मंड प्रांतात ही घटना घडली आहे. हेल्मंड प्रांताचे पोलीस व लष्करी कारवाईचे समन्वयक महंमद इस्माइल होटक यांनी सांगितले की, काल रात्री मुसा काला जिल्ह्य़ात तालिबान्यांनी हल्ला केला. तो तालिबानचा बालेकिल्ला मानला जातो. दहा पोलीस अधिकारी व काही तालिबानी हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. सुरक्षेसाठी इतर जिल्ह्य़ातून कुमक पाठवण्यात आली आहे.
तालिबानने आतापर्यंत अनेक हल्ल्यांची जबाबदारी घेतली असून, तालिबानी दहशतवादी तपासणी नाक्यांवर हल्ले करून पोलिसांना ठार मारत आहेत.
तालिबान्यांच्या हल्ल्यात २० पोलीस अधिकारी ठार
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे तालिबानी अतिरेक्यांनी तपासणी नाक्यांवर हल्ले करून वीस पोलीस अधिकाऱ्यांना शुक्रवारी ठार केले.
First published on: 14-06-2015 at 06:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban kill 20 police officers in afghanistan attack