अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. १६ ऑगस्टपासून देशामधील सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानने अद्याप तरी यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी बैठकींचे सत्र सुरु आहे. लवकरच तालिबानची सत्ता स्थापन होऊन नेतृत्व कोणाकडे जाणार यासंदर्भातील मोठी घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असं असतानाच या सत्ता स्थापनेच्या माध्यमातून अमेरिकेच्या जखमेवरील खपली काढण्याचा तालिबानचा डाव असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याला २० वर्ष येत्या शनिवारी पूर्ण होत असून त्याच दिवशी तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
नक्की वाचा >> पाकिस्तानच्या मदतीने तालिबानने निवडला प्रमुख नेता; हसन अखुंड होणार अफगाणिस्तानचे पंतप्रधान?
११ सप्टेंबर २०२१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होत आहेत. याच तारखेला २० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली हल्ला केला होता. त्यानंतरच अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं. अमेरिकने त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर घडवून आलं होतं. हा संघर्ष २० वर्षे चालला अखेर अमेरिकने मागील आठवड्यामध्ये आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेत असल्याची घोषणा केलीय. याच सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तालिबान आता पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची घोषणा ९/११ करुन अमेरिकेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा >> तालिबानला युनायडेट नेशन्सकडून मोठा दिलासा
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने अमेरिकेशी असलेला हिशोब चुकता केला. त्यानंतर तालिबानने अमेरिकेसोबतचं युद्ध संपवत असल्याची घोषणा केली. अमेरिकेनेही ३१ ऑगस्ट आधी अफगाणिस्तानमधून संपूर्ण माघार घेत असल्याचं सांगत दिलेला शब्द पाळत ३० ऑगस्टलाच अफगाणिस्तान सोडला. मात्र या सर्व घडामोडींनंतरही तालिबानने ओसामा बिन लादेन हा ९/११ च्या हल्ल्यामध्ये सहभागी नव्हता असा दावा केलाय. मागील २० वर्षांपासून तालिबान हाच दावा करत असून आजही त्यांचं तेच म्हणणं आहे. ओसामाचा सहभाग असल्याचा एकही सबळ पुरावा अमेरिकेकडे नसल्याचं तालिबानकडून सांगितलं जातं.
नक्की वाचा >> तालिबानमधील तरुण पॉर्न वेबसाइट्सवरुन तयार करतायत Kill List; जाणून घ्या काय आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वीच तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदने एनबीसी न्यूजाला दिलेल्या मुलाखतीमध्ये २० वर्षांपासून संघटनेकडून सांगण्यात येणाऱ्या गोष्टीचा पुन्हा एकदा उल्लेख केला. “अफगाणिस्तानमध्ये मागील २० वर्षांपासून युद्ध सुरु आहे. या २० वर्षांच्या संघर्षादरम्यान एकही असा पुरावा मिळाला नाही की ज्यामधून असं दिसून आलं की ओसामा बिन लादेन हा अमेरिकेवरील हल्ल्यासाठी जाबबदार होता. आपल्याकडे असा एकही पुरावा नाहीय जो ओसामाला जबाबदार धरु शकतो,” असं जबीहुल्लाहने म्हटलं होतं.