तालिबान्यांनी किमान एका वर्षांसाठी युद्धभूमीचा त्याग करावा म्हणून ब्रिटनच्या ‘इंटरनॅशनल सिक्युरिटी फोर्स’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुमारे ६० लाख पौंड रकमेची लाच देण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. याखेरीज, खटल्यांपासून माफीचाही प्रस्ताव असून ब्रिटिश आणि नाटोच्या सैन्याचा शत्रूपासून बचाव व्हावा, या हेतूने तालिबान्यांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी लक्षावधी पौण्डची रक्कम खर्ची घातली जात असली तरी तालिबान्यांकडून या ‘करारा’स कितपत प्रतिसाद मिळेल, याची खात्री नाही, असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा