तालिबानशी संबंध असल्याच्या कारणास्तव पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या विविध भागांत राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत किमान ६ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे.
सुरक्षा दलांनी टरनोल, बारा काहू व शहजाद येथे गुप्तचर छापे टाकले, तेथे अतिरेक्यांचे अड्डे असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की अटक करण्यात आलेल्यांचे महंमद आदिवासी भागातील तालिबानी अतिरेक्यांशी संबंध आहेत व त्यांना जाबजबाबासाठी गुप्त ठिकाणी हलवण्यात आले आहे.
इस्लामाबाद हे तालिबानी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असून तेथे सरकारी कार्यालये असल्याने ते उडवून देण्याचा त्यांचा इरादा होता.
 गेल्या वर्षी मार्च महिन्यात इस्लामाबाद येथे न्यायालयाच्या संकुलात करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात अतिरिक्त सत्र न्यायाधीशासह किमान ११ जण ठार तर इतर २९ जण जखमी झाले होते.

Story img Loader