अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानची तिथे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. दहशतवादी गटाने शुक्रवारी दावा केला की त्यांनी सुमारे ८५ टक्के अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात इराणसह सीमावर्ती भागांचादेखील समावेश आहे. तालिबानचा हा दावा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सैन्य माघार घेण्याच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतरच काही तासांनी पुढे आला आहे. इराणच्या सीमेवरील कस्बे इस्लाम हे शहर ताब्यात घेतल्याचे तालिबान्यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. त्या दाव्याची पुष्टी केली जाऊ शकत नाही. अफगाण सरकारनेही याबद्दल काही भाष्य केलेले नाही. तालिबानचे प्रवक्ते झाबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की त्यांनी कस्बे इस्लामवर ताबा मिळवला आहे.

३१ ऑगस्टपर्यंत माघारी जाणार सर्व अमेरिकन सैन्य

सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तालिबानशी संघर्ष सुरूच आहे. अफगाणच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की या भागात सर्व अफगाण सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. या भागांना तालिबानींच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याआधी अमेरिकेच्या सैन्य दलाचे काम ३१ ऑगस्ट रोजी संपेल असे बिडेन म्हणाले होते. अमेरिकन सैन्य दोन दशकांनंतर अफगाणिस्तानातून माघारी जात आहेत. दरम्यान, तालिबान्यांनी देशात हिंसाचारास सुरुवात केली आहे.

महिला एकट्या घरातून बाहेर पडू शकणार नाहीत

तालिबान्यांनी हे भाग ताब्यात घेताच नवीन कायदे लागू करण्यास सुरवात केली आहे. त्यात म्हटले आहे की कोणतीही स्त्री घरातून एकटीच बाहेर पडू शकत नाही. याशिवाय पुरुषांना दाढी वाढवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच वेळी तालिबान्यांनी हाकलून लावल्यानंतर सुरक्षा दलाचे तीनशे सैनिक त्यांच्या देशाची सीमा पार करून ताजिकिस्तानला पोहोचले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा विषयावर ताजिकिस्तानच्या राज्य समितीने ३०० अफगाण सैनीक आल्याची पुष्टी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban says now control 85 per cent of afghan territory abn