सर्वात उंच पुलावरून एका मिनिटाच्या प्रवासाचा थरार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नजर पोहोचणार नाही अशी खोल दरी आणि ती कापत तब्बल ३५९ मीटर उंचीवरून ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने धावणारी ट्रेन. अवघ्या एका मिनिटाचा हा थरारक अनुभव आणखी तीन वर्षांनंतर प्रवाशांना जम्मू-काश्मीरमध्ये अनुभवण्यास मिळणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पात जगातील सर्वात उंच पूल चिनाब नदीवर बांधण्यात येत असून त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प केला जात आहे. या प्रकल्पाची माहिती शिमला येथे चर्चासत्रात देण्यात आली. २८ हजार कोटी रुपयांच्या रेल लिंक प्रकल्पात दोन मोठे पूल उभारण्यात येत आहेत. यात अंजी आणि चिनाब नदीवरील पुलाचा समावेश आहे. यामधे जगातील सर्वात जास्त उंचीचा पूल चिनाब नदीवर उभारण्यात येत आहे. या पुलाच्या कामाला १९९५ मध्ये सुरुवात करण्यात आली.
तांत्रिक अडचणींमुळे मागे पडलेल्या पुलाच्या कामाला २००७ पासून प्रत्यक्षात वेग आला. जुलै २०१९ पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. रेल लिंक प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण होणार असून त्याआधीच चिनाब नदीवरील पूल सेवेत येणार आहे. १२०० कोटी रुपये खर्च असलेल्या चिनाब पुलाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाची लांबी १३१५ मीटर असून पुलाची उंची ३५० मीटर आहे. १३१५ मीटर लांबीपैकी ७०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाल्याची माहिती रेल लिंक प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनुराग साचन यांनी दिली. या पुलावर दोन ट्रॅक असतील आणि ताशी ८० किलोमीटर वेगाने लांबपल्लय़ाची गाडी एका मिनिटात पूल पार करेल, असेही ते म्हणाले. या पुलावर सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना आहेत.
आयफेल टॉवरची उंची ही ३२४ मीटर आहे. तर चिनाब नदीवर बनविला जाणारा पूल हा ३५९ मीटर उंच आहे.
अडथळ्याचा सामना
पुलाच्या कामासाठी दोन हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. छोटय़ा-छोटय़ा भूकंपामुळे पुलाचे काम करताना समस्या येतात. तर या भागात असलेल्या लहान रस्त्यांमुळे साहित्य घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांनाही अडथळा येतो. त्तरीही पूल वेळेतच पूर्ण होईल असा दावा करण्यात आला आहे.
रेल लिंक प्रकल्पातील बारामुल्ला ते बनिहाल हा एक टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे. त्यानंतर कटरा ते दुग्गा हा एक टप्पाही पूर्ण केला जाणार असून त्याला जोडूनच ८५ मीटरचा अंजी पूल आणि चिनाब पूलही सेवेत आणला जाणार आहे.
अनुराग साचन, रेल लिंक प्रकल्पाचे अधिकारी