वॉशिंगटन : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच (१९ फूट) पुतळय़ाचे अनावरण अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील मेरीलँड उपनगरात करण्यात आले. ‘समतेचा पुतळा’(स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी) असे त्यांचे नामकरण करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> उत्तर गाझामधून हजारोंचे स्थलांतर; २३ लाख रहिवाशांवर इस्रायली सैन्याच्या चढाईचे सावट

हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. ‘आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर’चे (एआयसी) अध्यक्ष राम कुमार यांनी या सोहळय़ानंतर सांगितले, की विषमतेची समस्या केवळ भारतातच नाही तर ती जगभरात सर्वत्र विविध रुपात अस्तित्वात आहे. ‘दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे राष्ट्रीय अध्यक्ष रवीकुमार नर्रा यांनी सांगितले, की आंबेडकरांचा हा अमेरिकेतील सर्वात उंच पुतळा आहे.

मोदी यांच्याकडून संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आंबेडकरवाद्यांनी अमेरिकेसह जागतिक स्तरावर एकात्म भारताचा पाया घातल्याबद्दल अभिनंदनाचा संदेश पाठवल्याचे अमेरिकेतील आंबेडकरी चळवळीचे नेते दिलीप म्हस्के यांनी सांगितले.