तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे खासदार ए राजा यांनी हिंदू धर्माविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. ए राजा यांनी तुम्ही जोपर्यंत हिंदू होत नाहीत तोपर्यंत तुम्ही शूद्र आहात. जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य आहात असे म्हटले जाते, असे विधान केल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाकडून ए राजा तसेच डीएमके पक्षावर टीका केली जात असून एका समुदायाला खूष ठेवण्यासाठी विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप केला आहे.
हेही वाचा >>> पश्चिम बंगाल : परवानगी नसताना भाजपाचा ‘चलो नबन्ना’ मोर्चा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं; रेल्वेस्थानक परिसरात राडा
तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ए राजा यांचा व्हिडीओ शेअर करून ए राजा तसेच डीएमके पक्षावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ए राजा यांनी एका समुदायाला खुष ठेवण्यासाठी दुसऱ्या समुदायाविषयी द्वेष पसवरणारे भाष्य केले आहे. तामिळनाडूचे आम्हीच मालक आहोत, असे त्यांना वाटत आहे. राज्याच्या राजकारणातील ही अतिशय दुर्वैवी मानसिकता आहे, असे अन्नामलाई म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> Covid-19: ऑक्सिजन तुटवड्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं, मृतांची मोजणी करून भरपाई द्या; मोदी सरकारवर संसदीय समितीचे ताशेरे
ए राजा नेमकं काय म्हणाले?
डीएमके पक्षाचे खासदार ए राजा यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त विधानं केलेली आहेत. त्यांच्यावर २-जी घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. ते गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या नमक्कल येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्मातील जातीभेदावर भाष्य केले. “जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाहीत, तोपर्यंत शूद्र आहात. जोपर्यंत हिंदू होत नाहीत, तोपर्यंत अस्पृश्य आहात, असे म्हटले जाते” असे ए राजा म्हणाले.
हेही वाचा >>> आंबेडकर जयंतीला संचलनाची परवानगी द्या; RSS ची मद्रास उच्च न्यायालयात याचिका
तसेच पुढे बोलाताना त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवरही टीका केली. तुम्ही ख्रिश्चन, मुस्लीम, पारसी नसाल तर हिंदू आहात, असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. अशा प्रकारचा अत्याचार दुसऱ्या कोणत्या देशात आहे का? असे ए राजा म्हणाले.